ऑनलाईन टीम / मुंबई :
कुख्यात डॉन अरुण गवळीला पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर येणार आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्याला पॅरोल मंजूर केला आहे. तब्बल 28 दिवसांसाठी त्याला ही संचित रजा मंजूर करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण गवळीने आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आणि कौटुंबिक न्यायालयात पॅरोलचा अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने मान्य केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अरुण गवळी हा 28 दिवसांसाठी आपल्या दगडी चाळीत परतणार आहे.
दरम्यान, अरुण गवळी हा कुख्यात डॉन असून शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. यापूर्वी सुद्धा अनेक वेळा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी याला जेलमधून संचित रजेवर सोडण्यात आलेले आहे.








