वसगडे / वार्ताहर
पदवीधर आमदार अरुण अण्णा लाड शेतकऱ्यांना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चोरटी व भुरटी पेटवापेटवीची आंदोलने कशाला करता असं म्हणतात. मी आमदार साहेबांना सांगू इच्छितो चोरटे कोण आहे ? हे आता ऊस उत्पादक शेतकऱ्याला व तालुक्यातील संपूर्ण जनतेला चांगल माहित झाल आहे. शेतकऱ्यांनीच आता आंदोलन हातात घेतले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना कधीही कोणाच्या पाठीवरती वार करत नाही. ती शेतकऱ्यांचे न्याय हक्कासाठी समोरासमोर बोलते, भांडते. आपल्याप्रमाणे पोटात एक आणि ओठात एक नसतं आमदार होण्या पुर्वी दिलेल आश्वासन पाहित्यांदा पाळा मग आराेप करा अस संदिप राजाेबा म्हणाले.
अरुणअण्णा जर स्वाभिमानी शेतकरी संघटना भुरटी व चोरटी होती तर पदवीधर निवडनुकीच्या वेळी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्याकडे आपण कशासाठी गेला होता? आपणाला आमदार करण्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सुद्धा वाटा आहे, हे लक्षात ठेवा. आम्हाला चोरटे म्हणता, मग आपण कोण आहात ? जनतेला सांगा, शेतकर्यांना सोबत घेऊनच स्वाभिमानी शेकतकरी संघटनेनी आंदोलन केली आहेत. म्हणूनच आज चारशे रुपये वरून ३२०० रुपयापर्यंत एक रकमी उसाचा दर शेतकरी घेतो हे पण लक्षात असू द्या. आमदार होण्यापूर्वी शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी देतो असे कारखान्याचे उपाध्यक्ष उमेश जोशी यांनी आपल्या व कारखाना प्रशासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या बैठकीत प्रसारमाध्यमांच्या समोर १८ नोव्हेंबर सांगीतल हाेत. हे विसरला काय असा सवाल राजाेबां यांनी करीत चोरटे भुरटे व फसवे हे कोण आहेत हे जनतेने आता ओळखलं आहे.
शेतकऱ्याला चांगलं कळतं आपल्या उसाचे बिल एक रक्कम मिळाल्यानंतर कुठे व कसे खर्च करायच, तुम्ही शेतकऱ्यांचा ऊस निम्मा तुटल्यानंतर शेतकऱ्यांच्या कडून दोन किंवा तीन टप्प्यांमध्ये बिल मिळाले तरी चालतं हे जबरदस्तीने लिहून घ्यायचं बंद करा. शेतकऱ्याला खिंडीत अडवायचं बंद करा शुगर केन कंट्रोल कायदा आम्हालाही व शेतकऱ्यांच्या पोरांना कळतो त्यासाठी तुमची शिकवणी लावायची गरज नाही. शेतकऱ्यांच्या साठी चळवळ उभा करणार असाल तर आम्हाला तुमच्या सोबत काम करायला सुद्धा आवडेल. मात्र एफआरपी देणेचा शब्द दिला ताे आता पाळा अस राजोबा म्हणाले.