ऑनलाईन टीम / बीजिंग :
अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ तिबेटच्या लिंझी प्रांतात चीन रेल्वे प्रकल्प उभारणार आहे. हा प्रकल्प सिचुआन ते तिबेट या मार्गावर असणार आहे.
चीनचा तिबेट मधला दुसरा मोठा रेल्वे प्रकल्प आहे. यापूर्वी चीनने किंगहाई-तिबेट हा प्रकल्प सुरू केला आहे. सिचुआन ते तिबेट या रेल्वे मार्गामुळे चीनच्या कोणत्याही भागातून थेट अरूणाचलच्या सीमेवर रेल्वेने सामग्री पोचवण्याचे काम चीनला सोपे होणार आहे.
काही दिवसांपूर्वीच चीनने अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सांगितला होता. भारताने हा दावा फेटाळून लावला होता. मात्र, त्यानंतर चीनने अरुणाचल प्रदेशच्या भागात रेल्वे प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली. लिझीं प्रांतात चीनने एक विमानतळही उभारले आहे. चीनच्या या हालचाली भारतासाठी धोकादायक ठरू शकतात.









