ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनने अरुणाचल प्रदेशात 101 घरं बांधून गाव वसवले आहे. भारतीय सीमेपासून साडेचार किमी आत येऊन चीनने हे बांधकाम केले आहे. सॅटेलाईटमधून समोर आलेल्या फोटोंची तज्ज्ञांकडून पडताळणी केल्यानंतर एका इंग्रजी संकेतस्थळाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
चीनने वसवलेले गाव सरकारी नकाशानुसार भारतीय हद्दीत येते. मात्र, त्यावर 1959 पासून चीनने कब्जा केला आहे. या ठिकाणी पूर्वी फक्त चिनी सैन्याची चौकी होती. आता मात्र, तिथे चीनने गावचं वसवले आहे. सॅटेलाईटमधून समोर आलेले फोटो 1 नोव्हेंबर 2020 रोजीचे असून, त्याची पडताळणी नुकतीच तज्ज्ञांनी केली.
अरुणाचल प्रदेशात असलेल्या अप्पर सुबनशिरी जिल्ह्याच्या हद्दीत हा भूभाग येतो. त्सारी चू नदीच्या काठावर चीनने हे गाव वसवले आहे.









