स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
वृत्तसंस्था / इटानगर
अरुणाचल प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पंचायत तसेच पालिका निवडणुकीत राज्यात सत्तारुढ असलेल्या भाजपचे 1075 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यात 22 डिसेंबर रोजी या निवडणुकांकरता मतदान होणार आहे.
भाजपचे 75 जिल्हा परिषद सदस्य तर 1 हजाराहून अधिक ग्रामपंचायत सदस्य तर पालिकांमधील 2 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. अप्पर सुबनसिरी जिल्हय़ात 11 जिल्हा परिषद सदस्य तर क्रा दादी येथे 7 तर लोअर सुबनसिरी, कमले आणि कुरुंग कुमे येथे 6 जण बिनविरोध निवडून आले आहेत. तर पश्चिम केमांग, पूर्व केमांग, अप्पर सियांग आणि चांगलांग जिल्हय़ातून 5 जण जिल्हा परिषदेवर बिनविरोध निवडून गेले आहेत.
दिबांग वॅली येथे 4, तवांग, पश्चिम सियांग आणि लोअर दिबांग, पापुम पारे, लेपा राडा, अनजॉव, नामसाई, तिराप आणि लाँगडिंग जिल्हय़ातून भाजपचे प्रत्येकी 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
इटानगर महापालिकेतही भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यात 25 जिल्हा परिषदा असून 241 मतदारसंघ आहेत. तर 2215 ग्रामपंचायतींमध्ये 8436 सदस्य आहेत. राज्यात इटानगर आणि पासीघाट येथे पालिका कार्यरत आहेत. राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आहे.









