ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांना धन्यवाद दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लोकडून दररोज 700 टन ऑक्सीजन मिळावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर बुधवारी केंद्र सरकारकडून 730 मिट्रिक टन ऑक्सीजन उपलब्ध झाला. प्रथमच केंद्र सरकारने दिल्लीला कोट्यापेक्षा अधिक पुरवठा केला आहे. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यांचे आभार मानले आहेत. तसेच आता ऑक्सीजन पुरवठा कमी करू नका अशी मागणी देखील केली आहे.
केजरीवाल यांनी असे निवेदन देखील केले आहे की, कमीत कमी एवढा ऑक्सीजनचा पुरवठा दिल्लीला दररोज केला जावा. यामध्ये कमी करू नये, असे देखील म्हटले आहे. तसेच पूर्ण दिल्ली आपली आभारी आहे.