ऑनलाईन टीम / तरुण भारत
आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज गोव्यात दाखल झाले आहेत. उद्या दिनांक १९ जानेवारी २०२२ रोजी ते गोवा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी आपचे अनेक पदाधिकारी आपली हजेरी लावणार असुन बैठकीनंतर ते आपच्या मुख्यमंत्री पदाचा उमेवार जाहीर करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार अॅड. अमित पालेकर यांचे नाव सद्या मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत असुन याबाबत केजरीवाल उद्या दि. १९ जानेवारी २०२२ रोजी बैठकीनंतर अधिकृतरित्या याबद्दल घोषणा करणार आहेत. केजरीवाल हे आज दुपारपर्यंत पंजाबमध्ये होते. यावेळी त्यांनी पंजाब विधानसभेसाठी आपच्या पंजाबमधील मुख्यमंत्री पदासाठीच्या उमेदवाराची घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे. याच पार्श्वभूमीवर गोव्यात आपच्या मुख्यमंत्री पदासाठीच्या उमेदवाराची घोषणा देखील करणार आहेत.
त्यामुळे गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजकिय घडामोडींना वेग आला असुन राजकीय पक्ष ही जनमत मिळवण्यासाठी गोव्यातील नागरीकांसमोर विकासाचा आराखडा ठेवत मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.
आम आदमी पक्षाने पंजाब निवडणूकीसाठी घेतला मोठा निर्णय
देशावर कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असतानाच आता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा शनिवारी(८ जाने.) केंद्रीय निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी केली. उत्तर प्रदेशात १०, १४, २०, २३ ,२७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्चला मतदान होणार असून १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. असे असतांनाच आता ‘आप’ने पंजाबमधील निवडणुकांसाठी आपला उमेदवार घोषित केला आहे.