वृत्तसंस्था/ दुबई
आयर्लंडचा संघ वनडे मालिका खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान उभय संघातील गुरूवारी खेळविला जाणारा पहिला वनडे सामना कोरोना समस्येमुळे तहकूब करण्यात आला आहे.
संयुक्त अरब अमिरातच्या कँपमध्ये अचानकपणे कोरोनाचे नवीन रूग्ण आढळल्याने दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळानी हा पहिला वनडे सामना तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या एक आठवडय़ाच्या कालावधीत हा सामना तीनवेळा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला. उभय संघातील या मालिकेला 8 जानेवारीपासून प्रारंभ नियोजित वेळापत्रकानुसार केला जाणार होता पण संयुक्त अरब अमिरात संघातील चिराग सुरी आणि लाक्रा हे खेळाडू कोरोना बाधित आढळले. त्यामुळे हा सामना 14 जानेवारी रोजी खेळविला जाणार होता. गुरूवारी कोरोनाचे नवे रूग्ण आढळले नाहीत.









