अयोध्या /प्रतिनिधी
सरकारी बँकेत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने शनिवारी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. श्रद्धा गुप्ता असं आत्महत्या करणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. त्यांनी शनिवारी अयोध्येत आत्महत्या केली आहे.
श्रद्धा गुप्ता यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी आशिष तिवारीसह तीन जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. श्रद्धा गुप्ता यांनी शनिवारी भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येला आयपीएस अधिकारी आशिष तिवारी, हेड कॉन्स्टेबल अनिल रावत आणि विवेक गुप्ता जबाबदार असल्याचे श्रद्धाने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते. श्रद्धा गेल्या पाच वर्षांपासून अयोध्येतील पंजाब नॅशनल बँकेत काम करत होती.









