जागतिक महामारी रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीची कठोर अंमलबजावणी अयोध्या जिल्हय़ात केली जात आहे. जिल्हय़ात आतापर्यंत एकही कोरोनाबाधित आढळून आलेला नाही. टाळेबंदीचे पालन सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केवळ होम डिलिव्हरीला चालना देण्याचा निर्देश दिला आहे. टाळेबंदीच्या दुसऱया टप्प्याची घोषणा झाल्यावर जिल्हाधिकारी अनुज कुमार झा यांनी पोलीस अधीक्षक आशिष तिवारी यांच्यासह अयोध्या शहर तसेच ग्रामीण भागाची पाहणी केली आहे. शहर क्षेत्रात सोशल डिस्टेंसिंगवर भर देण्याची सूचना प्रशासनाने केली आहे.
पोलीस स्थानक प्रमुखाला कुठल्याही भागात गर्दी होऊ न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार भाजीपाला बाजारपेठेवर काही निर्बंध लादण्याची सूचना करण्यात आली आहे. अयोध्येचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण असल्याने प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे.









