ऑनलाईन टीम / अयोध्या :
अयोध्येतील राम मंदिराची संपूर्ण जागा बुद्ध मंदिराची आहे. या जागेवर प्राचीन बुद्ध मंदिर असल्याचा दावा भारतातील बौद्ध भिक्षुंनी केला आहे. तसेच ही जागा बुद्ध मंदिराला परत मिळावी, यासाठी बौद्ध भिक्षुंनी मंगळवारपासून ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले आहे.
राम मंदिराचे काम सुरू झाल्यावर खोदकाम करताना जमिनीतून प्राचिन मंदिराचे जे अवशेष सापडले ते राम मंदिराचे नसून, बुद्ध मंदिराचे आहेत. जमिनीत सापडलेले विशिष्ट प्रकारचे खांब, त्यावरील आकृत्या आणि चक्र हे बौद्ध धर्मीय मंदिरातच आढळतात, असा दावा या बौद्ध भिक्षुंनी केला आहे.
रामजन्मभूमी हे प्राचिन बौद्ध स्थळ असून ती प्रसिद्ध साकेत नगरी होती. त्यामुळे राम मंदिराचे काम थांबवण्यात यावे, अशी मागणी या भिक्षुंनी केली आहे.









