ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अयोध्येतील रामजन्मभूमी लढ्याप्रमाणेच आता मथुरा येथील कृष्ण जन्मभूमी आणि वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर मुक्त करण्यासाठी कायदेशीर लढा देणार असल्याचे अखिल भारतीय आखडा परिषदेने म्हटले आहे.
आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली प्रयागराज येथे 13 आखाडा प्रमुखांची बैठक झाली. त्यामध्ये मथुरा आणि वाराणसीतील हिंदू मंदिरे मुक्त करण्यासाठी ठराव संमत करण्यात आला.
मुघलांच्या काळात मुस्लिम आणि दहशतवाद्यांनी हिंदूंची मंदिरे पाडून त्या ठिकाणी मशिदी उभारल्या. अयोध्येतही असाच काहीसा प्रकार घडला. मात्र, संत समुदायाने अयोध्येतील राम जन्मभूमीसाठी मोहीम राबवून प्रकरण निकाली निघाले. त्याचप्रमाणे मथुरा आणि वाराणसीत मोहीम राबविण्यात येणार आहे. तेथील मंदिरे पाडण्यात आल्याप्रकरणी आखाडा परिषद तक्रार दाखल करणार आहे.









