ऑनलाईन टीम / लखनऊ :
अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राममंदिरात सीता मातेलाही विशेष स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे श्रीलंकेतील अशोक वनाच्या सीता एलियातील एक शिळा राम मंदिरासाठी वापरण्यात येणार आहे. श्रीलंकेचे भारतातील राजदूत मिलिंदा मारागोदा यांच्याकडे ही शिळा आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
श्रीलंकेच्या अशोक वनात रावणाने सीतेला कैद करून ठेवले होते. त्या ठिकाणाला सीता एलिया वाटिका म्हटले जाते. येथे प्रभु श्रीराम आणि सीतेचे एक मंदिर आहे. या मंदिराला सीता अम्मन कोविलच्या नावाने ओळखले जाते. हे स्थान नुआरा एलियाहून उदा खोऱ्यात जाणाऱ्या एका मुख्य रस्त्यापासून 5 मैल अंतरावर आहे. तेथे आजही हनुमानाच्या पायाचे ठसे पहायला मिळत असल्याचे सांगण्यात येते.









