ऑनलाईन टीम / लखनऊ :
अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राममंदिरासाठी तामिळनाडूतील रामेश्वरमधून 613 किलोची घंटा भेट म्हणून आली आहे. विशेष म्हणजे या घंटेचा आवाज काही किलोमीटरपर्यंत ऐकू येतो. लीगल राईट कौन्सिलने राम मंदिरासाठी ही घंटा भेट दिली आहे.
17 सप्टेंबरला रामेश्वरमहून निघालेली राम रथयात्रा 21 दिवसांत 10 राज्यातून साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास करत बुधवारी अयोध्येत पोहोचली. या यात्रेत एकूण 18 लोक सहभागी झाले होते.
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रात पूजा केल्यानंतर तामिळनाडूच्या महिला राजलक्ष्मी मांडा यांनी राम मंदिर ट्रस्टला ही घंटा भेट दिली. यावेळी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी चंपत राय यांच्यासह स्थानिक महापौर, आमदार उपस्थित होते.









