ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेतील कॅपिटॉलमधील हिंसाचारानंतर नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या उद्या होणाऱ्या शपथविधीवरही हल्ल्याचे सावट आहे. हा हल्ला अंतर्गत सुरक्षा यंत्रणेतील जवानांकडून होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सुरक्षा जवानांवर FBI कडून नजर ठेवली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
उद्या (दि.20) अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष म्हणून बायडेन शपथ घेणार आहेत. तर कमला हॅरिस यादेखील उपाध्यक्ष पद स्वीकारणार आहेत. शपथविधीच्या सुरक्षेसाठी वॉशिंग्टनमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 25 हजार अतिरिक्त सैन्यही वॉशिंग्टनमध्ये दाखल होणार आहे. मात्र, सुरक्षा रक्षकांकडूनच बायडेन यांना धोका असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.









