ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
चीनची आक्रमकता वाढत असल्याने चीनला आव्हान देण्यासाठी अमेरिकेने हिंदी महासागरातील डिएगो गार्सिया बेटावर तीन बी 2 स्टेल्थ बॉम्बवाहक आणि बॉम्बवर्षक विमाने तैनात केली आहेत.
चीनकने मागील काही दिवस विस्तारवादाची भूमिका घेतली आहे. नुकतेच चीनने नेपाळच्या सात जिल्ह्यात अतिक्रमण करत त्यांच्या भूभागावर कब्जा केला आहे. त्यानंतर तैवानसोबतही चीनचे वाद आहेत. भारतासोबतही चीनचा सीमावाद आहे. कोरोनासारख्या कठीण परिस्थितीत चीनने कोणत्याही देशावर दबाव टाकून युद्धजन्य परिस्थिती निर्माण करू नये, असा इशारा अमेरिकेने दिला आहे.
बी 2 स्टेल्थ बॉम्बवाहक आणि बॉम्बवर्षक विमाने अण्वस्त्र वाहण्यासही सक्षम आहेत. 12 ऑगस्टलाच ही विमाने डिएगो गार्सिया बेटावर पोहचली होती. हिंदी महासागर, दक्षिण चीन आणि प्रशांत महासागरात शांतता अबाधित ठेवण्यात अमेरिका कटिबद्ध असे असे अमेरिकेने म्हटले आहे.









