ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील सॅन डिएगो सफारी पार्कमधील गोरिला जातीच्या 8 माकडांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा प्रकारची जगातील ही पहिलीच घटना आहे. सफारी पार्कच्या संचालक लीजा पीटरसन यांनी यासंदर्भात माहिती दिली.
पीटरसन म्हणाल्या, सफारी पार्कमधील देखभाल कर्मचाऱ्याद्वारे 8 गोरिलांना कोरोनाची लागण झाली आहे. तर इतर गोरिलांना खोकल्याचा त्रास होत आहे. त्यांना व्हिटॅमीन आणि इतर खाद्यपदार्थ देण्यात येत आहेत. त्यांच्यावर इतर कोणतेही उपचार सुरू नाहीत.









