ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले जो बायडेन अमेरिकेत 1 कोटी 10 लाख अनिवासी नागरिकांना नागरिकत्व देण्यासाठी आराखडा तयार करणार आहेत. त्यामध्ये 5 लाख भारतीय नागरिकांचाही समावेश असणार आहे.
निवडणूक प्रचारात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे बायडेन अनिवासी लोकांना नागरिकत्व देण्यासाठी संसदेसोबत काम सुरू करणार आहेत. येत्या वर्षभरात 1.25 लाख लोकांना अमेरिकेचे नागरिकत्व देण्याचा मानस आहे. त्यानंतर दरवर्षी 95 हजार लोकांना नागरिकत्व देण्याचा ते आराखडा तयार करणार आहेत.
सध्याच्या नागरिकत्व आणि व्हिसाबाबतच्या नियमात बदल करण्याचा ट्रम्प यांचा विचार होता. त्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या परदेशींवर नागरिकत्वाची टांगती तलवार होती. मात्र, बायडेन यांच्या नागरिकत्वाच्या धोरणांचा या सर्वांना फायदा होणार आहे.









