ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक असून, मागील 24 तासात अमेरिकेत कोरोनाने 2228 बळी घेतले आहेत. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
अमेरिकेत आतापर्यंत 6 लाख 13 हजार 886 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 26 हजार 047 जणांचा मृत्यू झाला आहे. 38 हजार 820 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही अमेरिकेत 5 लाख 49 हजार 919 ॲक्टिव केसेस आहेत. त्यामधील 13 हजार 473 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिका मात्र, कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरत आहे. कोरोनाच्या संकटामुळे अमेरिकेतील 17 कोटी लोकांना आपल्या नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे.
जगभरात 19 लाख 99 हजार 019 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 26 हजार 708 जणांचा मृत्यू झाला आहे.









