ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत आतापर्यंत 42 लाख 48 हजार 492 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 20 लाख 28 हजार 361 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत शुक्रवारी 78 हजार 009 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 1141 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या अमेरिकेत 20 लाख 71 हजार 639 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 19 हजार 98 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 1 लाख 48 हजार 492 जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात जास्त कोरोना संक्रमण अमेरिकेत झाले असून, दिवसेंदिवस तेथील रुग्णसंख्या 60 ते 65 हजारांनी वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 4 लाख 42 हजार 938 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 8337 जणांचा मृत्यू झाला आहे. तर न्यूयॉर्कमध्ये 4 लाख 38 हजार 435 जणांना बाधा झाली असून, 32 हजार 665 रुग्ण दगावले आहेत. याशिवाय न्यू जर्सी, टेक्सास, इलिनॉयस आणि फ्लोरिडातही कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे.









