ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोना लसीकरणाला वेग आला असतानाच राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. 19 एप्रिलपासून 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. 1 मे 2021 पर्यंत देशातील सर्वांना लस देण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे.
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक असल्याने तेथील 50 राज्यात कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. मागील 75 दिवसात 1.5 कोटी नागरिकांना लस देण्यात आली असून, येत्या काही दिवसात 2 कोटी लोकांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी 17 हजारांहून अधिक असलेली लसीकरण केंद्रे 40 हजार करण्याचा आदेशही बायडेन प्रशासनाकडून देण्यात आला आहे.









