ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोना विषाणू जगभरात कहर करत आहे. या साथीचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेनेकोरोनाविरुद्धच्या युद्धात आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने 12 ते 15 वयोगटातील मुलांमध्ये आपत्कालीन वापरासाठी फायझर-बायोएनटेकच्या कोरोनावरील लसीला मान्यता दिली आहे.
अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने 16 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी फायझर लस लागू करण्याला यापूर्वीच मान्यता दिली होती. तथापि, फायझर कंपनीला असे आढळले की, लहान मुलांवरही त्यांची लस प्रभावी ठरत आहे. आता 12 ते 15 वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यास दोन डोसची फायझर लस मंजूर करण्यात आली आहे.









