ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेतील लुईसियाना येथे 12 वर्षीय मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या गोळीबारात नऊ मुले जखमी झाली आहेत.
सेंट जॉनचे शेरिफ माइक ट्रेग्रे म्हणाले की, वाढदिवसाच्या पार्टीत अल्पवयीन मुलांच्या दोन गटात भांडण झाले. हे भांडण विकोपाला गेल्यानंतर दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर गोळीबार केला. यात 9 मुले जखमी झाली. त्यामधील 7 मुलांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर दोन मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या 16 वर्षीय मुलाच्या पोटात गोळी लागली असून, 14 वर्षीय मुलाच्या डोक्याला जखम झाली आहे.









