एका दंशाने माणसाला करू शकते बेहाल
अमेरिकेच्या मियामीमध्ये वैज्ञानिकांनी कोळय़ाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. हा कोळी एका दंशाद्वारे माणसांना वेदनेने व्याकुळ करू शकतो. हा कोळी ब्राझीलमध्ये आढळून येणाऱया ब्लॅक टारेंटयुलासारखाच दिसतो. याचे नाव पाइन रॉकलँड ट्रेपडर स्पायडर ठेवण्यात आले आहे. याला सर्वप्रथम फ्लोरिडाच्या मियामी प्राणिसंग्रहालयात पाहिले गेले होते.
नरापेक्षा मोठी असते मादी कोळी

नर कोळय़ाचा आकार सध्याच्या 1 रुपयांच्या नाण्याइतका असतो. तर मादी कोळी दोन ते तीन पट अधिक मोठी असते. रॉकलँड ट्रेपडर स्पायडर एक जाळे विणणारा कोळी आहे. यामुळे तो आपल्या शिकारापासून लपून राहतो आणि जाळय़ात अडकणाऱया शिकारांना ग्रहण करतो. अशा प्रकारचा कोळी स्वतःच्या पूर्ण जीवनात दशकांपर्यंत एकाच ठिकाणी जाळे विणून राहू शकतो.
घात लावून करतो शिकार
माझ्यासाठी हा एक छोटा चमकदार काळय़ा टारेंटयुलासमान आहे. अशाप्रकारच्या प्रजाती घात लावलेल्या शिकाऱयांप्रमाणे असतात. त्या भूसभूशीत आणि वाळवंटी पृष्ठभागावर जाळे विणून स्वतःची शिकार अडकण्याची प्रतीक्षा करतात. यादरम्यान त्या स्वतःच्या चांगल्याप्रकारे लपवून ठेवतात अशी माहिती मियामी प्राणिसंग्रहालयाचे मुख्य संरक्षक फँक रिडले यांनी दिली आहे.
जंगलात मिळाला होता कोळी
मियामी प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱयांनी पाइन रॉकलँड जंगलात हा कोळय़ाला पाहिले होते. कर्मचाऱयांनी नमुन्यासाठी एक छायाचित्र घेत ओळख पटविण्यासाठी ते प्राणिसंग्रहालयाच्या संरक्षण आणि संशोधन विभागाला पुरविले. चौकशीदरम्यान कोळय़ाची ही प्रजाती आजपर्यंत ज्ञात कुठल्याही अन्य प्रजातींपैकी नसल्याचे आढळून आले.









