ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 3 कोटींच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. या देशात आतापर्यंत 2 कोटी 98 लाख 01 हजार 506 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 5 लाख 40 हजार 574 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
मंगळवारी येथे 55 हजार 683 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 1704 जणांचा मृत्यू झाला. एकूण 02.98 कोटी कोरोना रूग्णांपैकी 2 कोटी 05 लाख 49 हजार 678 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर अजूनही 87 लाख 11 हजार 354 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 12 हजार 715 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 37 कोटी 18 लाख 94 हजार 718 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
कॅलिफोर्नियामध्ये सर्वाधिक संक्रमण
कॅलिफोर्नियामध्ये कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 36 लाख 08 हजार 376 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 54 हजार 621 जणांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासमध्ये 27 लाख 08 हजार 716 जणांना बाधा झाली असून, 45 हजार 808 रुग्ण दगावले आहेत.









