ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत 2 कोटी 51 लाख 96 हजार 086 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 4 लाख 20 हजार 285 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत गुरुवारी 1 लाख 93 हजार 758 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 4363 जणांचा मृत्यू झाला. 02.51 कोटी कोरोना रूग्णांपैकी 1 कोटी 11 लाख 991 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 96 लाख 74 हजार 810 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 27 हजार 653 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 29 कोटी 35 लाख 62 हजार 574 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
कॅलिफोर्नियामध्ये कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 31 लाख 03 हजार 836 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 35 हजार 766 जणांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासमध्ये 22 लाख 14 हजार 767 जणांना बाधा झाली असून, 34 हजार 165 रुग्ण दगावले आहेत.