लसीकरणासाठी धडपड
लॅटिन देशांमध्ये लसीकरणाची प्रक्रिया अत्यंत मंद
फ्लोरिडाच्या मियामी किनाऱयावर सध्या दक्षिण अमेरिकेतून येणाऱया शेकडो पर्यटकांच्या लांब रांगा दिसून येत आहेत. हे सर्वजण कोरोनावरील लस घेण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत. येथील लसीकरण केंद्रावर व्यक्तीला स्थानिक रहिवासी असल्याचा किंवा अन्य कुठलेच दस्तऐवज दाखवावे लागत आहे. ऑनलाईन नोंदणीनंतर जॉन्सन अँड जॉन्सनची सिंगल डोस व्हॅक्सिन दिली जाते, ज्यानंतर कुठलेही मुक्तपणे फिरता येते.

याचमुळे दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोर, अल-साल्वाडोर आणि व्हेनेझुएलामधून मोठय़ा संख्येत पर्यटक पोहोचले आहेत. या देशांमध्ये लसीकरणाचा वेग खूपच मंद आहे. माझ्या देशात लसीकरण खूपच मंद असल्याने मला लस कधी मिळेल हे सांगता येत नव्हते. याचमूळे मी माझ्या वृद्ध आईवडिलांना घेऊन येथे आल्याचे होंडुरास येथून आलेल्या मारिया बोनिला यांनी सांगितले आहे.
त्यांच्याप्रमाणे मेक्सिकोतून 50 वर्षीय ब्लांका डियाज आल्या आहेत. मेक्सिकोत आता लसीकरण सुरू झाले आहे, मला लस मिळण्यास मोठा वेळ लागला असता याचमुळे येथे आल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण यादरम्यान अमेरिकेत येण्यासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागत आहे.
लसीची अत्यंत गरज असलेल्या सर्व लोकांना आम्ही मदत करत आहोत. ज्यांच्याकडे पैसा आहे ते स्वतःला सुरक्षित करत आहेत, पण गरीबांविषयी कुणीच विचार करत नसल्याचे उद्गार मियामी बीचचे सिटी कमिशनर डेव्हिड रिचर्डसन यांनी काढले आहेत.
हवाई प्रवास महागला
दुसरीकडे या व्हॅक्सिन पर्यटकांमुळे हवाई प्रवासभाडय़ात वाढ झाली आहे. ब्यूनॉस आयर्स ते मियामी विमानप्रवासाचे तिकीट सुमारे 1 हजार डॉलर्स (सुमारे 73 हजार रुपये होते.) चे होते. हे प्रवासभाडे आता दुप्पट झाले आहे. अशाचप्रकारे अन्य फ्लाइट्सच्या दरातही वाढ झाली आहे.









