ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तोंडावरच डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने गूगल, फेसबुक आणि ट्विटर यासारख्या मोठ्या टेक कंपन्यांना राजकीय जाहिराती प्रसिद्ध करण्यास बंदी घातली आहे.
गूगल, फेसबुक आणि ट्विटर या कंपन्या पुराणमतवादी, धार्मिक आणि गर्भपाताविरोधीत विचारांना दडपल्याचा आरोप सरकारवर करत आहेत. त्यामुळे या कंपन्यांच्या प्रमुखांना आज अमेरिकन सिनेटमध्ये उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आले होते. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, फेसबुकचे मार्क जुकरबर्ग आणि ट्विटरचे सीआओ जॅक डोर्सी यांना अमेरिकन सिनेटमध्ये चौकशी केली जाणार आहे. यामध्ये त्यांना सोशल मीडिया आरोपांची उत्तरेही द्यावी लागणार आहेत.
दरम्यान, फेसबुक आता कोणतीही राजकीय जाहिरात दाखवणार नाही. निवडणुकीनंतर गुगलदेखील राजकीय जाहिराती थांबवणार आहे तर ट्विटरनेही सर्व राजकीय जाहिरातींवर बंदी घातल्याचे सांगण्यात येते.









