ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 45 लाखांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 44 लाख 98 हजार 343 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 52 हजार 320 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत मंगळवारी 64 हजार 729 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1245 जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात जास्त कोरोना संक्रमण अमेरिकेत झाले आहे. दररोज सरासरी 60 हजार नवे रुग्ण आढळत असल्याने तेथील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. 44.98 लाख कोरोना रूग्णांपैकी 21 लाख 85 हजार 894 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 21 लाख 60 हजार 129 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 18 हजार 992 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 4 लाख 74 हजार 903 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 8714 जणांचा मृत्यू झाला आहे. तर न्यूयॉर्कमध्ये 4 लाख 41 हजार 435 जणांना बाधा झाली असून, 32 हजार 719 रुग्ण दगावले आहेत. याशिवाय न्यू जर्सी, टेक्सास, इलिनॉयस आणि फ्लोरिडातही कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात झाले आहे.









