ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 95 लाखांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 94 लाख 75 हजार 788 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 2 लाख 36 हजार 501 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत रविवारी 71 हजार 321 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 399 जणांचा मृत्यू झाला आहे. 94.75 लाख कोरोना रूग्णांपैकी 61 लाख 04 लाख 417 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 31 लाख 34 हजार 870 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 17 हजार 205 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 14 कोटी 50 लाख 42 हजार 416 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
टेक्सास, कॅलिफोर्नियात सर्वाधिक रुग्ण
अमेरिकेतील टेक्सासमध्ये कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 9 लाख 60 हजार 927 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 18 हजार 614 जणांचा मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्नियामध्ये 9 लाख 36 हजार 843 जणांना बाधा झाली असून, 17 हजार 672 रुग्ण दगावले आहेत. तर न्यूयॉर्कमध्ये 5 लाख 46 हजार 246 रुग्ण आढळून आले. त्यामधील 33 हजार 687 जणांचा मृत्यू झाला आहे.









