ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 75 लाखांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 74 लाख 94 हजार 671 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 2 लाख 12 हजार 660 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत गुरुवारी 47 हजार 389 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 920 जणांचा मृत्यू झाला आहे. 74.94 लाख कोरोना रूग्णांपैकी 47 लाख 36 लाख 621 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 25 लाख 45 हजार 390 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 14 हजार 190 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 10 कोटी 84 लाख 31 हजार 960 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
कॅलिफोर्निया, टेक्सासमध्ये सर्वाधिक रुग्ण
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 8 लाख 22 हजार 693 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 15 हजार 989 जणांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासमध्ये 7 लाख 90 हजार 467 जणांना बाधा झाली असून, 16 हजार 267 रुग्ण दगावले आहेत. तर न्यूयॉर्कमध्ये 4 लाख 94 हजार 607 रुग्ण आढळून आले. त्यामधील 33 हजार 266 जणांचा मृत्यू झाला आहे.









