ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत आतापर्यंत 2 कोटी 82 लाख 61 हजार 470 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 4 लाख 97 हजार 174 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
वर्ल्डोमीटरनुसार, अमेरिकेत रविवारी 64 हजार 297 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर 1111 जणांचा मृत्यू झाला. 2.82 कोटी कोरोना रूग्णांपैकी 1 कोटी 82 लाख 24 हजार 288 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 95 लाख 40 हजार 008 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 19 हजार 400 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात कोरोनाबळींची संख्या जास्त आहे. येथे 15 लाख 76 हजार 188 रुग्ण आढळून आले. त्यामधील 46 हजार 069 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









