ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत आतापर्यंत 3 कोटी 37 लाख 47 हजार 439 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 6 लाख 533 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत सोमवारी 25 हजार 030 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर 369 जणांचा मृत्यू झाला. 3.37 कोटी कोरोना रूग्णांपैकी 2 कोटी 72 लाख 02 हजार 309 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 59 लाख 44 हजार 597 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 07 हजार 790 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कॅलिफोर्नियात सर्वाधिक बळी
कॅलिफोर्नियात कोरोनाबळींची संख्या जास्त आहे. येथे 37 लाख 70 हजार 150 रुग्ण आढळून आले. त्यामधील 62 हजार 701 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे.









