ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या अटलांटा शहरातील एका मत्स्यालयात ठेवण्यात आलेल्या ऑटर्स या प्राण्यालाही कोरोनाची लागण झाली आहे.
जॉर्जिया मत्स्यालयाकडून ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. ऑटर्स हा उभयचर प्राणी आहे. काही दिवसांपूर्वी मत्स्यालयातील काही ऑटर्सला सर्दी झाली होती. त्यांना शिंका आणि खोकलादेखील येत होता. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. दरम्यानच्या काळात एका ऑटर्सला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. हे ऑटर्स एशियन स्मॉल क्लॉड ऑटर्स आहेत. या ऑटर्सला स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले असून, वैद्यकीय टीम त्यांची काळजी घेत आहे.
या ऑटर्सला कर्मचाऱ्याकडून कोरोनाची लागण झाल्याचे शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या ऑटर्सच्या संपर्कात येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आल्याचे जॉर्जिया एक्वेरिअमचे डॉ. टोन्या क्लॉस यांनी सांगितले.









