ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
कोरोनामुळे सधन अमेरिकेतही आता अन्नछत्राखाली रांगा लागल्या आहेत. दुकानांमधून अत्यावश्यक किराणा गायब झाल्याने आणि रोजगार नसलेल्या लोकांची अन्नछत्राखालील गर्दी 40 टक्क्यांनी वाढली आहे.
कोरोनामुळे अमेरिकेतील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. त्यातच 2 कोटी 20 लाख अमेरिकन नागरिकांनी नोकरी गमावल्याने गरिबांना अन्न शिजवणे कठीण झाले आहे. त्यामुळे अमेरिकीही अन्नछत्राच्या रांगेत उभे राहू लागले आहेत. फरक एवढाच आहे की भारतातील गरीब उन्हातान्हात उभे राहून हे अन्न घेण्यासाठी रांगा लावतात तर अमेरिकन लोक आपल्या मोटारींत बसून या अन्नासाठी रांग लावत आहेत.
अमेरिकेतील फूड बँकेतून मोफत अन्न घेणाऱ्यांच्या संख्येत 40 टक्के वाढ झाली आहे. न्यूयॉर्कमधील 8 फूड बँकांतून 227 टन अन्नाचे गरजूंना वाटप झाले आहे.









