अमेरिकेच्या रॉकेट हल्ल्यात इराणचे कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शुक्रवारी तेल बाजारात याचा मोठा परिणाम झाला होता. या घटनेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत चार टक्क्यांहून अधिकची तेजी नोंदवली आहे. या हल्ल्यामुळे इराण आणि त्यांच्या शेजारचा परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमेरिकेकडून शुक्रवारी सकाळी बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला आहे. यामध्ये इराण सैन्याचे जनरल कासिम सुलेमानी यांना मारले आहे. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रध्वजाचे चित्र ट्वीट केले होते. तर सुलेमानी यांना मारण्याचे आदेश अमेरिकेच्या संरक्षण विभागाने पेन्टागॉन येथून देण्यात आल्याचे म्हटले आहे. परंतु या सर्व घडामोडींनंतर कच्च्या तेलाची किंमत 4.4 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरेल 69.16 डॉलर राहिले आहे. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटमधील कच्चे तेल 4.3 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरेल 63.84 डॉलर राहिले आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील देशांमधील कच्च्या तेलाच्या पुरवठय़ावर नकारात्मक परिणाम झाल्याची नोंद करण्यात आली आहे.








