ऑनलाईन टीम तरुण भारत
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनच्या परराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांची पोलंडमध्ये भेट घेतली. मध्य वॉर्सातील मेरियट हॉटेलमध्ये ही भेट झाली. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनच्या उच्चपदस्थांशी बायडेन यांनी प्रथमच थेट चर्चा केली. शनिवारी उशिरा बायडेन वॉर्सा येथे भाषणही करणार होते. त्यात रशियन आक्रमणाचा मुक्त जग एकजुटीने विरोध करत असल्याचा मुद्दा ते अधोरेखित करणार आहेत. पुतिन यांना रोखण्यासाठी जगातील सर्व बलाढय़ राष्ट्रे एकत्र आली असल्याचेही ते स्पष्ट करतील, असे व्हाइट हाऊसतर्फे सांगण्यात आले होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे शनिवारी सकाळी यूएस आणि युक्रेनचे परराष्ट्र धोरण आणि संरक्षण नेत्यांच्या बैठकीत उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी यूएस आर्मीच्या 82 व्या एअरबोर्न डिव्हिजनच्या सदस्यांना संबोधित केले. “तुम्ही लोकशाही आणि उच्चभ्रूंची लढाईच्या मध्यभागी आहात,” लोकशाही टिकणार आहे की स्वैराचार चालणार आहे?, असं म्हणत त्यांनी रशियाला इशारा दिलाय.
बायडेन पुढे म्हणाले की, “आम्ही सुरुवातीपासूनच सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगत आहोत की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युद्ध थांबवण्यास भाग पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे.” युक्रेनच्या लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी मानवतावादी प्रयत्नांचे कौतुक केले.









