वॉशिंग्टन डीसी
कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन तसेच नव्या व्हेरियंटच्या प्रसाराची दखल घेऊन अमेरिकेने नेपाळ देशाला 6 लाखहून अधिक लसींचा पुरवठा केला आहे.
अमेरिकेने फायजर या लसीचे वितरण नुकतेच नेपाळ देशाला मोफतपणे केले असल्याची माहिती आहे. अमेरिकेने यापूर्वीही वर्षाच्या सुरुवातीला अशा प्रकारची लस पुरवण्याची मदत नेपाळला केली होती. कोरोनाव्हायरसच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याच्या कारणास्तव अमेरिकेने 6 लाख 64 हजार 560 नव्या लसी नेपाळला पाठवून दिल्या आहेत. 12 वर्षे किंवा त्यापेक्षा वरील लोकांना ही लस कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. एक लाखाहून अधिक फायझरच्या लसी आणि पंधरा लाखाहून अधिक जॉन्सन ऍन्ड जॉन्सनच्या लसी वर्षाच्या सुरुवातीला नेपाळला मोफत पुरवल्या होत्या. 122 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतक्मया किमतीच्या लसींचा पुरवठा नेपाळला आजवर करण्यात आला असल्याचे सरकारच्यावतीने सांगण्यात आले. लसीव्यतिरिक्त जीव वाचवणारी औषधे देण्यासोबत प्रशिक्षण आणि तांत्रिक सहकार्यही अमेरिकेने नेपाळला केले आहे. अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विकास एजन्सी आणि युनिसेफ यांच्या भागीदारीतून लसींचे वितरण नेपाळमध्ये केले जात असल्याचे सांगितले जाते.









