वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वाहनांचे लहान मोठे पार्ट बनविणारी कंपनी स्टील स्ट्रिप्सला अमेरिकेकडून 1.77 कोटी रुपयाची ऑर्डर मिळाली असल्याची माहिती सोमवारी स्टील स्ट्रिप्सने दिली आहे. शेअर बाजारात देण्यात आलेलेल्या महितीनुसार अमेरिकेमधील केरावान ट्रेलर वाहनांसाठी 30 हजार चाके तयार करण्याची ऑर्डर प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. सदर ऑर्डरचा पुरवठा करण्यासाठी चेन्नईमधील सप्टेंबरमध्ये काम पूर्ण करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. स्ट्रिप्स व्हील्स लिमिटेड यांनी ही ऑर्डर 2,37,000 अमेरिकी डॉलर इतकी असल्याचे म्हटले आहे. आगामी काळात बाजारातील स्थिती स्थिर झाल्यानंतर सदर ऑर्डर्स वाढत जाणार असल्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. कंपनीने ऑर्डर पूर्ण करण्याची तयारी केली आहे.









