ऑनलाईन टीम / बगदाद :
इराकच्या बगदादमध्ये अमेरिकेने आज पुन्हा एक हवाई हल्ला चढविला आहे. या हल्ल्यात सहा जण ठार झाले असून, तीन जण गंभीर जखमी आहेत.
अमेरिकेने बगदादमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात दोन वाहनांना लक्ष्य करण्यात आले होते. या वाहनांमधून प्रवास करणाऱया सहा जणांचा जळून मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ईराण समर्थक मिलिशिया हश्द अल शाबी चा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हश्द अल शाबी हा ईराण समर्थक प्रसिद्ध मोबलाइजेशन फोर्सेसचे दुसरे नाव आहे.
गुरुवारी रात्रीही अमेरिकेने बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला केला होता. त्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्या हल्ल्यात इराकचा मेजर जनरल कासिम सुलेमानचा खात्मा झाला होता.









