अमेरिका: काबूल विमानतळावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यात ९५ अफगाणी नागरिक व १३ अमेरिकी सैनिक ठार झाले असून ज्यांनी हे कृत्य केले त्यांना शोधून काढून किंमत मोजायला लावली जाईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी वक्तव्य केलं होतं. या वक्तव्य केल्यानंतर केल्यानंतर अवघ्या ४८ तासांमध्ये अमेरिकेने शनिवारी पहाटे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनांच्या तळांवर ड्रोनने बॉम्ब हल्ले करून हल्लेखोरांचा खात्मा केला.
काबूल विमानतळावर हल्ला केल्यानंतर जबाबदारी स्वीकारणाऱ्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या तळांवर अमेरिकेने बॉम्ब हल्ले केले. यासंदर्भातील माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पँटागॉनने दिली आहे. काबूल विमानतळावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यात ९५ अफगाणी नागरिक व १३ अमेरिकी सैनिक ठार झालेत. या हल्लयामध्ये प्राण गमावणाऱ्यांमध्ये १३ अमेरिकन सैनिक असल्याने अमेरिका या हल्ल्यानंतर चांगलाच खवळला होता.
Previous Articleकाँग्रेसच्या गट, जिल्हा समित्या बरखास्त
Next Article श्री विश्वकर्मा मूर्ती प्रतिष्ठापना दिन 5 रोजी









