ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अमेरिकन नौदलाने ‘एमएच-60 आर’ ही बहुभूमिका असलेली दोन हेलिकॉप्टर्स भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली आहेत. अमेरिकन सरकारकडून परदेशी लष्करी विक्रीअंतर्गतL लॉकहीड मार्टिनने तयार केलेली ही 24 हेलिकॉप्टर्स भारतीय नौदल विकत घेत असून, त्याची किंमत अंदाजे 2.4 अब्ज डॉलर्स आहे.
सॅन डिएगोच्या नौदलाच्या एनएएस नॉर्थ आयलंड येथे शुक्रवारी झालेल्या समारंभात अमेरिकन नौदलाकडून ही हेलिकॉप्टर्स औपचारिकपणे भारतीय नौदलाकडे देण्यात आली. या कार्यक्रमाला अमेरिकेचे भारताचे राजदूत रणजितसिंग संधू उपस्थित होते.
राजदूत संधू म्हणाले की, बहुभूमिका असलेली हेलिकॉप्टर्स ताफ्यात समाविष्ट करणे हे भारत-अमेरिका द्विपक्षीय संरक्षण संबंधातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “भारत-अमेरिका मैत्री नवीन उंची गाठत आहे.”









