ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेतील इदाहो येथे दोन विमानांची समोरासमोर धडक झाली. दुर्घटनेवेळी दोन्ही विमाने एका तळ्याच्या वर उड्डाण करत असल्याने ही विमाने थेट तळ्यात कोसळून बुडाली. यात आठ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इदाहो येथील कोएरी डॅलिन सरोवरावर उड्डाण करत असताना ही विमाने एकमेकांना धडकली. त्यानंतर दुर्घटनाग्रस्त विमाने थेट पाण्यात बुडाली. तेथील स्थानिक वेळेनुसार रविवारी दुपारी 2.20 वाजता ही दुर्घटना घडली.
दरम्यान, दोन्ही विमाने तळ्यात बुडण्याआधी दोन मृतदेह हाती लागले आहेत. तर इतरांचा शोध स्थानिक प्रशासनाकडून घेतला जात आहे. मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि मृतांचाही समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.









