ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोविड-19 च्या लढाईत भारताला मदत करणार आहेत. या लढ्यासाठी भारताला व्हेंटिलेटर देणार असल्याचे ट्रम्प यांनी शनिवारी ट्विट करुन सांगितले.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, कोरोना विरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहेत. मला सांगायला आनंद होत आहे की, अमेरिका भारताला व्हेंटिलेटर दान करेल. याशिवाय अमेरिका आणि भारत एकत्र मिळून कोरोनावर लस विकसित करु, अदृश्य कोरोना विषाणूच्या नष्ट करु.
पुढे ते म्हणाले, 2020 च्या अखेरीस कोरोनावर लस विकसित काम पूर्ण होईल आणि बाजारात उपलब्ध होईल अशी आशा आहे. असे ही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेने कोरोना व्हायरस चा खात्मा करण्यासाठी तीन दशलक्ष अमेरिकन डॉलरची आर्थिक मदत देखील केली होती.