वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची 2021 सालातील कनिष्ठ पुरुष गटातील विश्वचषक हॉकी स्पर्धा भुवनेश्वरमध्ये होणार असून या स्पर्धेसाठी अमेरिका, चिली आणि मलेशियाचे हॉकी संघ गुरुवारी येथे दाखल झाल्याची माहिती ओदिशा हॉकी संघटनेच्या प्रवक्त्याने दिली.
या स्पर्धेसाठी क गटात कोरिया, स्पेन, हॉलंड आणि अमेरिका यांच्या समावेश आहे. प्राथमिक गटातील लढतीत अमेरिकन सघाला अव्वल प्रतिस्पर्धी संघांशी लढत त्यावी लागणार आहे. कॅलिफोर्नियामध्ये अमेरिकन संघासाठी 10 दिवसांचे सराव शिबिर आयोजित केले होते. सदर स्पर्धा भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर आयोजित होणार आहे. मलेशियाचा हॉकी संघ बुधवारी रात्ती भुवनेश्वरमध्ये दाखल झाला.
चिली संघानेही या स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली असून या संघाचे नेतृत्त्व निकोलास अबुजेटमकडे सोपविण्यात आले आहे. अमेरिकेचा या स्पर्धेतीला सलामीचा सामना स्पेनबरोबर 25 नोव्हेंबरला होणार आहे. चिली आणि मलेशिया या दोन संघाचा समावेश अ गटात करण्यात आला असून या गटात बेल्जियम व दक्षिण आफ्रिका यांचाही सहभाग आहे.









