काबूलमध्ये अडकून पडलेल्या हिंदू-शिखधर्मीयांचे कृत्य- सरकारच्या अडचणीत वाढ
अफगाणिस्तानातून आतापर्यंत शेकडो लोकांना भारत सरकारने सुरक्षित परत आणले आहे. भारतीय वायुदलाची विमाने सातत्याने काबूलसाठी झेपावत आहेत. याचदरम्यान अफगाणिस्तानातील शीख आणि हिंदूंचे अमेरिका आणि कॅनडाला जाण्याचे स्वप्न भारत सरकारसाठी मोठय़ा समस्येचे कारण ठरले आहे. अफगाण शीख आणि हिंदू काबूलमधून बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत विलंब करत आहेत.
अफगाणिस्तानच्या गुरुद्वारा कर्ते परवानमध्ये असलेले 70 ते 80 अफगाण शीख आणि हिंदू भारतात परतू इच्छित नाही, या लोकांची कॅनडा किंवा अमेरिकेत जाण्याची इच्छा आहे. हे लोक नागरिकांना बाहेर काढण्याच्या प्रक्रिये अडथळा निर्माण करत आहे, याचबरोबर अन्य लोकांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत विलंब करत असल्याचे विधान इंडियन वर्ल्ड फोरमचे अध्यक्ष पुनीत सिंह चंधोक यांनी केले आहे.
अमेरिका आणि कॅनडाला जाण्याच्या नादात या लोकांनी दोनवेळा स्वतःची फ्लाइट सोडली आहे. भारत सरकार या लोकांना सर्वात उच्च स्तराची सुविधा उपलब्ध करत असूनही हा प्रकार घडत असल्याचे ते म्हणाले.
तर गुरुद्वारात असलेल्या शिखांचे नेते तलविंदर सिंह यांनी व्हिडिओ संदेश प्रसारित करत त्यांना कॅनड किंवा अमेरिकेत जाऊ द्यावे असे म्हटले आहे. शीख संघटनांनी सर्व अफगाण शीख आणि हिंदूंना बाहेर काढण्यासाठी चार्टेड प्लेनची व्यवस्था केली आहे. यातील 100 लोक काबूल विमानतळाबाहेर पोहोचले, पण त्यांना प्रवेश मिळू शकला नाही.









