सेन्सेक्स 162 अंकानी घसरला : निफ्टी 12,226.65 वर बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱया घडामोडींचा जागतिक शेअर बाजारांसोबत देशातील व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रावर या गोष्टीचा नकारात्मक परिणाम होत असतो. तसेच शुक्रवारी अमेरिकेकडून भौगोलिक वादाच्या कारणास्तव दराणच्या विमानतळावर हल्ला केला आहे. यामध्ये इराणचे जनरल सुलेमान यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे जगातील विविध देशांना कच्च्या तेलाच्या होणाऱया पुवरठय़ावर नकारात्मक प्रभाव राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. त्यामुळे देशातील बाजारात सप्ताहाच्या अंतिम सत्रात शुक्रवारी घसरणीची नोंद झाली आहे.
दिवसभरातील व्यवहारात शुक्रवारी सेन्सेक्स दिवसअखेर 162.03 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 41,464.61 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी दिवसअखेर 55.55 अंकानी घसरुन निर्देशांक 12,226.65 वर बंद झाला आहे. दिग्गज कंपन्यांमध्ये एशियन पेन्ट्सचे समभाग सर्वाधिक म्हणजे 2.16 टक्क्यांनी घसरले आहेत. तर सोबत ऍक्सिस बँक, बजाज ऑटो, स्टेट बँक, एनटीपीसी आणि बजाज फायनान्स यांचे समभाग घसरले आहेत. शेअर बाजरात शुक्रवारी सन फार्मा, टीसीएस, एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि भारती एअरटेल यांचे समभाग मात्र 2.08 टक्क्यांनी वधारले आहेत.
गुंतवणूकदार चिंतेत
अचानक घडलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील अमेरिका आणि इराण यांच्यातील हल्ल्यामुळे जागतिक स्तरासह देशातील गुंतवणूकदार चिंतेत राहणार आहेत. तर या घटनेचे परिणाम आगामी काळातही विविध उद्योग क्षेत्रासह अन्य व्यापारी घटनांवर होणार आहेत. याकरीता आगामी काळातील गुंतवणूक ही सावधगिरी राखण्याची गरज असल्याचे शेअर बाजार अभ्यासकांनी म्हटले आहे. शुक्रवारी कच्च्या तेलाचे दर 4.4 टक्क्यांनी वधारले असून दर प्रति बॅरेल 69.16 वर राहिले होते.







