सेन्सेंक्स 51.73 अंकानी घसरला : निफ्टी 12,025.35 वर बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
मागील आठवडय़ातील अंतिम दिवसांपासून ते चालू आठवडय़ाच्या तिसऱया सत्रापर्यंत मुंबई शेअर बाजारातील व्यवहारांवर अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाचा प्रभाव कायम राहीला असल्याचे पहावयास मिळाले आहे. जागतिक बाजारापेठांच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास अमेरिका आर्थिक बाजूनी बलाढय़ असणारा देश आहे. तर दुसऱया बाजूला कच्च्या खनिज तेलाची सर्वाधिक निर्यात करणार देश म्हणून इराणला ओळखले जाते. त्यामुळे या दोन्ही देशातील घडणाऱया घटनांचा अन्य देशांतील अर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम होत आहेत. विशेष म्हणजे भांडवली बाजारातील उलाढालीवर सर्वाधिक नकारात्मक प्रभाव निर्माण होत आहे.
चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी मुंबई शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. यामुळे दिवसभरातील व्यवहारानंतर सेन्सेंक्स 51.73 अंकानी घसरुन निर्देशांक 40,817.74 वर बंद झाला आहे. तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी दिवस अखेर 27.60 टक्क्यांनी घसरण होत निर्देशांक 12,025.35 वर बंद झाला आहे.
दिवसभरातील व्यवहारात सेन्सेंक्सने 40,866.36 चा उच्चांक पार केला तर दुसरीकडे 40,476.55 चा निचांक गाठला होता. दुसऱया बाजूला निफ्टी 12,044.95 चा टप्पा गाठला होता, तर 11,929.60 इतका खालचा स्तर पार करत निफ्टी कार्यरत राहिला होता.बीएसईमधील 12 कंपन्याचे समभाग तेजीत तर 18 कंपन्याचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील 21 कंपन्या लाल निशाण्यावर बंद झाल्या तर 29 कंपन्यांमधील समभागांची विक्री झाली आहे.
दिग्गज कंपन्यामध्ये भारती एअरटेलचे समभाग सर्वाधिक म्हणजे 2.74 , टीसीएस, 2.26, अल्ट्राटेक सिमेंट 1.62, बजाज फायनान्स 1.06 आणि आयसीआयसीआय बँकेचे समभाग 0.99 टक्क्यांनी तेजीत राहिले होते.







