वैयक्तिक मुलाखतीची अट शिथिल:अमेरिकेचा मोठा निर्णय
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेने भारतातील विद्यार्थी आणि कामगारांसह अनेक व्हिसा अर्जदारांना यावषी 31 डिसेंबरपर्यंत भारतातील आपल्या दुतावासांमध्ये मुलाखतीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची अट शिथिल केली आहे. सूट देण्यात आलेल्यांमध्ये विद्यार्थी (एफ, एम आणि जे व्हिसा), कामगार (एच-1, एच-2, एच-3 आणि एल व्हिसा), संस्कृती आणि अपवादात्मक क्षमता असलेले लोक (ओ, पी आणि क्यू व्हिसा) यांचा समावेश आहे. भारतातील व्हिसा अर्जदारांना या सुविधेचा फार लाभ होईल, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे आशियाई-अमेरिकन्ससाठीचे सल्लागार अजय जैन भुटोरिया यांनी केला आहे.
अमेरिकेने यावषी 31 डिसेंबरपर्यंत भारतातील व्हिसा अर्जदारांसाठी वैयक्तिक मुलाखतीचे नियम बदलले आहेत. आता अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱया ठराविक लोकांना भारतातील अमेरिकन दुतावासात प्रत्यक्ष हजर राहून मुलाखती देण्याची गरज भासणार नसल्याची माहिती अमेरिकेच्या एका वरि÷ राजनैतिकाने भारतीय समुदायाच्या नेत्यांना दिली. दक्षिण मध्य आशियाचे सहाय्यक परराष्ट्र सचिव डोनाल लू यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.
20 हजारांहून अधिक जणांना संधी
नवी दिल्लीतील अमेरिकन दुतावासाच्या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या सूचनेनुसार, नवी दिल्लीतील युएस दुतावास आणि त्याचे चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबई येथील वाणिज्य दुतावास पात्र अर्जदारांना मुलाखतीतून सूट देण्याच्या परवानगीसाठी 20 हजारपेक्षा अधिक जणांना संधी जारी करणार आहे.









