वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
येथे 31 ऑगस्टपासून खेळविल्या जाणाऱया अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतून स्पेनचा टॉप सीडेड टेनिसपटू तसेच या स्पर्धेतील माजी विजेता राफेल नादालने कोरोना महामारीच्या भीतीने माघार घेतल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली आहे.
कोरोना महामारीमुळे एटीपी टूरवरील सुमारे 19 स्पर्धां लांबणीवर किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. अमेरिकन टेनिस स्पर्धा 31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर दरम्यान होणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे आपण इच्छा असूनही अमेरिकन टेनिस स्पर्धेतून माघार घेत असल्याचे नादालने सांगितले. अमेरिकन टेनिस स्पर्धा संपल्यानंतर दोन आठवडय़ाच्या कालावधीने प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा पॅरीसमध्ये खेळविली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचा आपण विचार करीत असल्याचे नादालने म्हटले आहे. नादालने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत 19 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. ऑस्ट्रेलियाची टॉप सीडेड महिला टेनिसपटू बार्टीने गेल्या आठवडय़ात अमेरिकन टेनिस स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले होते. आता त्यामुळे या स्पर्धेत आता रूमानियाची हॅलेपला टॉप सिडिंग देण्यात आले आहे. अमेरिकेची सेरेना विलीयम्स सातव्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.









